आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना निवेदन:नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करा ; सोयाबीन, उडीद, मुग, तूर पिकांचे नुकसान

उमरगा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा-लोहारा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावातील पिकांचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी शुक्रवारी (दि.५) मुख्यमंत्र्यांची भेट घेवून आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघातील उमरगा लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांत सर्वदुर पाऊस आणि काही मंडळात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग, तूर आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. २०२० च्या नुकसानीपोटी मिळणारी पीकविम्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळाली नाही.

तसेच काही भागातील सोयाबीन पिकांचेही गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे नुकसान झाले. शेतकरी आधीच आर्थिक संकटात खरीप हंगामातील नुकसान शेतकऱ्यांना पेलवणारे नाही. यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस मदत जाहीर करणे नितांत गरजेचे आहे. तरी उमरगा व लोहारा तालुक्यात पाऊस, अतिवृष्टी व गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांचे आणि पावसात वाहुन गेलेल्या जमिनींचे पंचनामे करुण्याबाबत संबंधित विभागास आदेशीत करावे व शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत जाहीर करावी, अशी विनंती आमदार चौगुले यांनी निवेदनात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...