आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामे:कदेर येथे दोन कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कदेर येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्न व ग्रामपंचायतीकडून मंजूर व पूर्ण झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण रविवारी (दि.३) आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या हस्ते झाले. श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त स्वामी समर्थ मठाचे उद्घाटनही करण्यात आले. कदेर येथे जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत पूरहानी दुरुस्ती योजनेतून कदेर ते कंटेकूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी, जनसुविधा योजनेतून शिवबा नगर येथे सिमेंट रस्त्यासाठी १० लाख, २२/२५ योजनेतून रस्त्यासाठी १० लाख, दाजी पाटील घर-कोंडीबा गायकवाड घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी २० लाख, आमदार निधीतून सूर्यवंशी गल्लीतील सभामंडप दुरुस्तीसाठी तीन लाख, लक्ष्मण मुरमे घर-अंगणवाडी रस्त्यासाठी सात लाख, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून धनगर वस्तीत सिमेंट रस्त्यांसाठी १२ लाख, ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातून गावांतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी ३१ लाख आदी दोन कोटींच्या विकासकामांचा यात समावेश आहे.

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी स्वामी समर्थ महाराज मठातील भक्तांच्या सोयीसाठी आमदार निधीतून सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये जाहीर केले. यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, शरद पवार, लक्ष्मण कलबुर्गे, विश्वनाथ शिंदे, हणमंत गुरव, सरपंच सतीश जाधव, बाजार समिती संचालक व्यंकटराव पाटील, शाखाप्रमुख बाबुराव बिराजदार, उपसरपंच पिंटू राठोड, शाखाप्रमुख कपिल गायकवाड, सुभाष गायकवाड, स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी दगडू महाराज, विलास पवार, ग्रापं सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...