आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:तुगाव सरपंचपदी दीपक जोमदे बिनविरोध

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीप्रणित शेतकरी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवून या पॅनलचे १२ उमेदवार निवडून आले. या पार्श्वभूमीवर २६ रोजी सरपंच व उपसरपंच यांची निवड झाली. सरपंचपदी दीपक अरविंद जोमदे व उपसरपंचपदी संजय रामचंद्र बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ आधिकारी टी. एम. आमले यांनी काम पाहिले. यावेळेस तलाठी राजीव पाटील व ग्रामविकास अधिकारी एन.डी. शिरगिरे यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य केले. यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच आणि सर्व नवनिर्वाचित सदस्याचा श्रद्धानंद माने- पाटील यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. सदस्य चव्हाण सुभाष, मोहन शिंदे, व्यंकट कांबळे, गणेश माने, सौ.गीता हरी माने, सौ अंबुबाई दुधभाते, सौ.आशा माने सौ.शामल चव्हाण,सौ.सुमिता शिंदेसौ.रिहानबी जमादार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...