आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शिवशंभूपंढरी वसाहतीमध्ये दीपोत्सवाचे आयोजन ; हिंदी गीतांच्या कार्यक्रमास प्रतिसाद

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिवशंभूपंढरी वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर प्रतिवर्षाप्रमाणे संस्कार भारती उस्मानाबाद शहर संयोजन समिती च्या वतीने आयोजित 'रांगोळी दीपोत्सव २०२२ ' परिवार मेळावा उत्साहात संपन्न झाला.खंडग्रास सूर्यग्रहणानंतर प्रथम श्रीपतराव भोसले विद्यालयाचे कलाध्यापक शेषनाथ केशरबाई दगडोबा वाघ व शरद वडगावकर यांनी संस्कार भारती रांगोळीचे रेखाटन करुन मान्यवर पदाधिकाऱ्याच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन संस्कारभारतीचे ध्येयगीत त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येयमंत्र पठण करण्यात आले .

संस्कार भारती जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर यांनी उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास देवगिरी प्रांत सह चित्रकला विधा प्रमुख तथा जिल्हा मार्गदर्शक शेषनाथ वाघ संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, शहर संयोजन समिती अध्यक्ष शरद वडगावकर,विवेकानंद केंदप्रमुख श्यामराव दहिटणकर , जिल्हा संगीत विधाप्रमुख सुरेश वाघमारे - सुंभेकर जिल्हाप्रसिध्दी प्रमुख रविंद्र कुलकर्णी, धनंजय जेवळीकर , मंगेश वैजापुरे, सौ. सुदर्शना वाघ उपस्थित होते . परिवार मेळाव्यात मराठी अंभग जुन्या हिंदी समुधुर गीतांचे गायनासह दिवाळी फराळही करण्यात आला व रांगोळी दीपोत्सवाची प्रसायदानाने सांगता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...