आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महापुरुष व महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समिती तुळजापूर, स्वराज्य संघटना व छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
त्यात म्हटले आहे की, कोश्यारी यांनी त्यांच्या भाषणांतून वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या भावनेशी खेळ केला. यापूर्वी त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवा, अन्यथा उद्रेक होईल. तसेच स्वराज्य संघटना, छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात जनआंदोलन उभारण्यात येईल.
त्यास सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रशासन असेल, याची नोंद घ्यावी, अशी मागणी सर्व संघटनेच्या वतीने केली आहे. निवेदनावर स्वराज्य संघटनेचे महेश गवळी, अनिल माने, प्रशांत अपराध, औदुंबर जमदाडे, कुमार टोले, अतुल हावळे, सुदर्शन पटाडे, प्रशांत इंगळे, छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ते जिनवराजे इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे, ज्ञानेश्वर लाकाळ, तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके, महेश गवळी यांच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.