आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:आत्महत्येस प्रवृत्त करणाराविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

उमरगा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंधळी समाजातील गरीब कामगाराला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा असे निवेदन गोंधळी समाज बांधवांच्या वतिने गुरुवारी दि.२४ रोजी तहसिलदारांना देण्यात आले. उमरगा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.लातुर या कारखान्यामध्ये शेतकरी सहायक म्हणून कार्यरत असणारे दिलीप मल्हारी घोटकर वय (५८) रा.मौजे गांजुर (ताडगी) ता.जि.लातुर यांनी रविवार दि.१३ नोव्हेंबर रोजी स्वतःच्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या केली.

त्यांच्या जवळ आत्महत्येपुर्वी लिहुन ठेवलेली चिठ्ठी आढळुन आली. त्यामध्ये कारखान्यातील वरिष्ठ शेतकी अधिकारी व ऊस पुरवठा अधिकारी यांच्या कडून मानसिक त्रास दिला जात असल्याने या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.ही घटना घडल्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी घटनेस जबाबदार संबधीतावर जो पर्यंत गुन्हा नोंदवत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती.

मात्र पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्याने समाज बांधव व गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.यासंदर्भातील निवेदन उमरगा तहसिलदारांना उमरगा शहर गोंधळी समाजाच्या वतिने देण्यात आले.निवेदनावर माजी नगरसेवक अरुण ईगवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.अविनाश साळूंके , गणेश गरुड, बालाजी मद्रे, रतन ईगवे, संजीव पांचगे आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...