आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:जात प्रमाणपत्रासाठीच्या अटी रद्द करण्याची मागणी; ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन

भूम16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जात प्रमाणपत्र काढण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी उपविभागीय अधिकारी रोहिणी रोहिणी नऱ्हे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जाचक अटींमुळे जात प्रमाणपत्र काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय जनगणनेचा १९५१ चा उतारा अथवा १९५४ चा खासरा पाणी नकलेची मागणी वारंवार होत आहे. या उताऱ्याची मागणी केली असता उतारा हा जीर्ण व खराब झाला आहे, असे लेखी पत्र लेखा विभागाकडून दिले जात आहे‌. ते पत्र पुरावा घेऊन नागरिक सेतू केंद्राकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी जातात. परंतु १९५१ चा उतारा अथवा खसरा पाण्याची नक्कल जोडण्यासाठी आग्रह धरला जात आहे.

यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जात प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही. पूर्वी हा समाज गावकुसाबाहेर जगण्यासाठी इतरत्र जात होता. त्यामुळे १९५१ च्या वेळेस काही लोकांच्या नोंदी नाही अथवा त्यावेळेस तर जमिनी नव्हत्या, त्यामुळे खासरा पाण्याची नक्कल मिळणे कठीण झाले आहे. तसेच स्थळ पंचनाम्याची मागणी केली जात आहे.

त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत. सरपंच, पोलिसपाटील व घरातील एका व्यक्तीचे जात प्रमाणपत्र जोडले असल्यास संबंधिताने त्या आधारे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावे. १९५१ व १९५४ ची खासरा पाण्याची नक्कल ही जाचक अट रद्द करावी. जात प्रमाणपत्राचा प्रस्ताव दाखल केल्यापासून २१ दिवसांच्या आत जात प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे, परंतु २१ दिवसात वारंवार त्रुटी काढतात. एकाच वेळी प्रस्तावासोबत जी कागदपत्र कमी आहेत ती तेव्हाच सांगायला हवी. परंतु प्रत्येकवेळी नवीन त्रुटी काढण्यात येते. जात प्रमाणपत्रासाठी ६ महिने लागत आहे. निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, तालुकाध्यक्ष महेंद्र गायकवाड, तालुका उपाध्यक्ष लहू नागटिळक, कदू जानराव, विकी जावळे, पाथरूड शाखाध्यक्ष प्रदीप साठे, अनिल मिसाळ, विकी जावळे, सुनील बनसोडे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष दत्ता साठे यांच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...