आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:श्रद्धाची हत्या करणारास फाशीच्या शिक्षेची मागणी

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर या युवतीचा अमानुषपणे खून करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय एकता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी धडक मोर्चा काढण्यात आला.श्रद्धाचा अतिशय निघृणपणे खून केला आहे. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आहेत. त्यामुळे असा खून करणारा क्रूर, राक्षसी वृत्तीचा व निर्दयी आफताब याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी.

महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्यात यावेत. तसेच अशाच घटना रोज देशात घडत असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारने कडक धोरणे अंमलात आणावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ममता शर्मा, किशोर शिंदे, सत्यजित सुरवसे, शिवाजी सुरवसे, सिद्धार्थ सुरवसे, रंगनाथ तुपे, वृंदावनी गवळी, प्रमिला झोंबाडे, लक्ष्मी गायकवाड, अनिल गावसाने, दादा पवार, अनिल जाधवर आदींसह सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...