आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरवर्तन:लोमटे महाराज यांना अटकेची मागणी

कळंब10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर येथील लोमटे महाराज यांना अटक करा या मागणीचे निवेदन अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कळंब च्या वतीने पोलीस उपविभागीय यांना देण्यात आले आहे.

मलकापूर तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद येथील एकनाथ सुभाष लोमटे यांनी महिला त्यांची भक्त म्हणून दर्शनासाठी गेली असता तिच्या सोबत गैरवर्तन केले होते. याच भोंदू बाबा वर या आगोदर येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. सदर मठात अंधश्रध्देला खतपाणी घालणारे अनेक प्रकार चालतात, दैवी चमत्काराचा दावा केला जातो, अज्ञानी, दैववादी सामान्य लोकांची लूट केली जाते. या गंभीर प्रकरणाची कसून चौकशी करून त्यांचेवर जादूटोणा प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी निवेदनावर अंनिस जिल्हाकार्याध्यक्ष अरविंद शिंदे, बालाजी राऊत, कळंब तालुकाध्यक्ष सुरेश धावारे, संतोष लिमकर, प्रा.ईश्वर राठोड, सुर्यवंशी दीपक, कसबे सोमनाथ, गुंडरे दादाराव, सिद्धार्थ कांबळे, दत्ता भांडे, संदीप सूर्यवंशी व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...