आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी लोहारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुधवारी (दि. ९) तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, अनेकवेळा संसदरत्न म्हणून गौरवण्यात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे जेणेकरून भविष्यात कुठलाही मंत्री अशी चूक करणार नाही, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक जालिंदर कोकणे, बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, जिल्हा कार्यकरिणी सदस्य बाबा शेख, काँग्रेस शहराध्यक्ष के. डी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सरचिटणीस प्रकाश भगत, युवक शहराध्यक्ष निहाल मुजावर, असिफ बागवान, नरदेव कदम, युवक कार्याध्यक्ष उमेश देवकर, भागवत वाघमारे, शैलेश कांबळे, वैजीनाथ जट्टे आदि उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.