आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 गावांचा समावेश:जवळा (नि) आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जवळा (नि) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे जवळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जवळा (नि) येथील आरोग्यवर्धिनी नाव असलेल्या प्रा. आरोग्य केंद्रात जवळा परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. या केंद्रांतर्गत वाकडी, सिरसाव व खासापूरी येथे उपकेंद्र असून २० गावांचा समावेश आहे. अनेक गावांतील वयोवृद्ध, पुरुष, महिला, गरोदर माता, नवजात बालके जवळा प्रा. आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असतात. जवळा ग्रामस्थांच्या वतीने विजयकुमार कारकर यांनी पुणे येथे जावून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेत निवेदन दिले. याप्रसंगी रामभाऊ पवार, आप्पा कारंडे, आप्पा अंधारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...