आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानाची घोषणा:प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तातडीने वितरीत करण्याची मागणी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारने सत्त्तेत आल्यानंतर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा केली. परंतु दोन वर्षानंतर देखील प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत.शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा विषय प्राधान्याने घेत बँकाकडे पैसे वर्ग केले.ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वाटप करावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे केली आहे.

आधार प्रमाणीकरण झालेल्या २३ हजार ३९३ शेतकऱ्यांचे ७५.६१ कोटी रूपये राज्य सरकारने वर्ग केले आहेत. परंतु जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केलेले ७५.६१ कोटी रूपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात यावे,यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ‍निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील काकडे,सतीश दंडनाईक, प्रदीप शिंदे,राजसिंहा राजेनिंबाळकर,नाना कदम,अभय इंगळे,देवा नायकल,गणेश मोरे,शेषेराव उंबरे,अमोल निडवदे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...