आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:किमान वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी

परंडा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे किमान वेतन श्रेणी लागू करावी याबाबतचे निवेदन जवळा (नि) येथील कार्यकर्ती सीमा गवारे यांच्यासह मदतनीस यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेत आहोत.अंगणवाडी कार्यकर्ती यांना ८५०० व मदतनीसला ४३०० एवढे तुटपुंजे मानधन मिळत आहे. अंगणवाडीत सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत वेळ देऊन प्रवेश घेतलेल्या बालकांना शिक्षण व भोजन तसेच खेळ आदी कर्तव्य पार पाडावी लागतात.प्राथमिक शिक्षका प्रमाणे काम करुन देखील तुटपुंजे मानधन मिळत आहे. निवेदनावर सीमा गवारे यांच्या सह अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस आदीची स्वाक्षरी आहे.

बातम्या आणखी आहेत...