आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळदुर्ग येथून गेलेला तुळजापूर - अक्कलकोट या राज्य महामार्गाच्या नळदुर्ग बसस्थानक ते गोलाई पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांनी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की नळदुर्ग हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ सोलापूर-विजयवाडा व राज्य महामार्ग तुळजापूर- अक्कलकोट या महामार्गावर वसले आहे.
या महामार्गावरून दररोज हजारोंच्या संख्येने वाहने ये जा करतात. महामार्गाच्या कडेने व महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने महामार्गावर सतत ट्राफिक जॅम होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महामार्गाच्या दोन्ही बाजूला नागरी वस्ती तसेच शाळा व महाविद्यालये आहेत. महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने मागील काही वर्षांमध्ये दहा ते बारा जणांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. लोकांची सुरक्षा धोक्यात आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे यांच्यासह शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक शरीफ शेख, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन ताजोद्दीन सय्यद, विलास येडगे, दादासाहेब बनसोडे, सुधीर पोतदार, भीमाशंकर बताले, अमित शेंडगे,लखन भोसले उपस्थित होते.यावेळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नळदुर्ग चे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार उपस्थित हे होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा केली व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.