आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:निराधार, भूमिहीनांच्या मागण्या, जाणीव संघटनेकडून निदर्शने

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसील कार्यालयावर सोमवारी जाणीव संघटनेच्या वतीने निराधार, भूमिहीन यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार या योजनेसाठी केलेले अर्ज मागील एक वर्षापासून मंजूर झालेले नाहीत. ज्यांचे अर्ज मंजूर आहेत, त्यांना सानुग्रह अनुदान वेळेत वितरीत होत नाही. आणि झाले तर त्यात तफावत असते. यासह गायरान अतिक्रमित शेतकऱ्यांना शासनाच्या २०११ च्या आदेशानुसार मालकी हक्काची नोंद घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनाचा स्विकार नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांनी केला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, शेषेराव गाडे, ताई सुरवसे, नवनाथ शिंदे यांच्यासह तालुक्यातील शेकडो निराधार, भूमिहीन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...