आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

उस्मानाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि.६) ग्रामीण युवक, शेतकरी, शेतकरी महिलांसाठी शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. सोयाबीन पिकाची ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली.

भारतीय शेतीमध्ये ड्रोनचा वापर सिंचन निरीक्षण, पीक आरोग्य देखरेख, पीक नुकसान मुल्यांकन, मृद विश्लेषण इत्यादी कामांसाठी केला जावू शकतो. ड्रोनच्या वापरामुळे इंधनामध्ये आणि वेळेमध्ये बचत होते. तसेच खर्चही कमी होतो, असे मत प्रा. अपेक्षा कसबे यांनी व्यक्त करून ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकरी, शेतकरी महिलांना दाखवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...