आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह विधान:कोश्यारी यांच्या निषेधार्थ निदर्शने ; जिल्हाधिकारी कार्यालसमोर केले जोरदार घोषणाबाजी

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह पूर्ण भारताचे आराध्य दैवत आहेत. त्या काळातही सर्व जगासाठी आदर्श व आयडॉल होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करण्यापूर्वी खूप जबाबदारीने व विचार करून बोलणे महत्वाचे आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. विवेक शिंदे, मजहर शेरीकर, सचिन सरवदे, तुषार वाघमारे, अजय कुमार कोळी, रॉबिन बलाडे, ज्ञानेश्वर निंबाळकर, उमेश पवार, वैभव मोरे व इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...