आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य करुन महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतरही वक्तव्यावर महाराष्ट्रातील जनतेची माफी मागीतली नाही. याचा निषेध म्हणुन जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार अरविंद सावंत, रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत व खासदार राजन विचारे यांच्यासह संसदेच्या बाहेर“हटा दो हटा दो राज्यपाल को हटा दो” च्या घोषणा देत आंदोलन केले. या बाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यपाल पद हे राज्यातील घटनात्मक प्रमुखाचे पद आहे. कोश्यारी एवढ्यावर न थांबता महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावर सुध्दा अवमानजनक विधान करुन पुन्हा चर्चेत आले.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील मानद पदवी समारंभात अवमानजनक विधान केले. भाजपचे प्रवक्ते असलेले सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर आदी वाचाळ वीरांनीही महाराजांच्या संदर्भामध्ये अवमानजनक विधाने केली. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या खासदारांकडून अशा वाचाळ विरांच्या विरोधात घोषणाबाजी करत अनोख्या पध्दतीने निदर्शन करत लोकसभेच्या १० व्या सत्राच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे लोकप्रतिनिधींनी केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेध केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.