आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Demonstrations Of NCP In Front Of Collector's Office; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​Various Announcements By Farmers Shook The Area

अतिवृष्टी:राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ; ​​​​​​​शेतकऱ्यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणला

उस्मानाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले. शासनाने वारंवार घोषणा करूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. वारंवार निवेदने देऊनही अनुदान मिळाले नाही. अनुदान मिळावे या व इतर मागण्यांसाठी सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यात म्हटले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे मुख्य पीक असून ते अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेले . मदतीची शासनाने वारंवार घोषणा करून देखील अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे सतत अडचणीत असलेला शेतकरी अडचणीमध्ये येत असल्याची बाजू मांडण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नेते संजय निंबाळकर, नंदकुमार गवारे, मसुद शेख, रणवीर इंगळे, आयाज शेख, भारत शिंदे, रमेश देशमुख, प्रशांत फड, प्रवीण शिंदे, इक्बाल पटेल, बालाजी ठोंगे, सागर चिंचकर, नाना जमदाडे, नितीन शिंदे, औदुंबर धोंगडे, पवार, वाजेद पठाण, गणेश गडकर, बबनराव वाकुरे, गाडेकर, राजाभाऊ मुंडे आदींसह पदाधिकारी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...