आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरण चिघळले‎:आडत बंद ठेवून धमकीचा निषेध‎

कळंब‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीचे सचिवांना अतिक्रमणधारकांनी धमकी दिल्याची घटना घडली ‎असून याच्या निषेधार्थ आडत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. तसेच ‎ ‎ अतिक्रमण काढण्याचे निवेदन पोलिस ‎ निरीक्षकांना देण्यात आले.‎ कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात‎ मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण वाढत‎ चालले आहे. हे अतिक्रमणधारक‎ अवैधरीत्या धंदे करत आहेत. याचा नाहक‎ त्रास होत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून‎ परिसरातील अतिक्रमणे काढण्यात यावीत,‎ अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.‎

त्यामुळे सचिव दत्तात्रय वाघ यांनी‎ अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला.‎ यामुळे संतापलेल्या अतिक्रमण धारकांनी‎ जागा नावावर कर अन्यथा डोक्यात गोळी‎ घालून ठार करतो, अशी धमकी बाजार‎ समितीच्या सचिवांना देण्यात आल्याचा‎ धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे‎ संतापलेल्या व्यापाऱ्यांनी सकाळ आडत व‎ इतर दुकाने बंद ठेवली. त्यानंतर सर्व‎ व्यापाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांना निवेदन‎ दिले आहे.

बाजार समितीच्या आवारात‎ अतिक्रमण केलेल्या काही गुन्हेगार‎ क्षेत्रातील लोकांनी बाजार आवारात‎ व्यवसाय करत असलेल्या व्यापाऱ्यांना‎ दुकानात आणलेल्या शेतकऱ्यांच्या‎ शेतमालाच्या चोऱ्या केलेल्या आहेत.‎ अनेक वेळा व्यापाऱ्यांच्या दुकानावर सुरक्षा‎ रक्षक म्हणून काम करत असलेल्या‎ व्यक्तिंना मारहान करून खून केलेले आहे.‎

सद्या बाजार समिती आवारातील‎ व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे.‎ यामुळे अनेक व्यापारी दुकान बंद‎ करण्याच्या मार्गावर आहेत. अनेक‎ व्यापाऱ्यांचे व्यवसाय लहान असून लहान‎ मोठ्या चोरांनी उध्वस्त होत आहेत.‎ अनेकवेळा जागा सोडण्यासाठी धमकी‎ दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...