आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रेची सांगता:मैलारपूरहून निघाले; तुळजापूर‎ गजबजले‎

तुळजापूर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मैलारपूर येथील‎ खंडोबा यात्रेनंतर परतीच्या‎ मार्गावरील भक्तांनी शनिवारी ‎तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी‎ गर्दी केली होती. दिवसभर पारंपरिक ‎ ‎पद्धतीने खंडोबाच्या काठ्या नाचवत ‎वारू खेळवत खंडेरायाचा जयघोष घुमत होता.‎ पौष पौर्णिमेला मैलारपूर‎ (नळदुर्ग) येथे खंडोबाच्या छबिना ‎मिरवणुकीने यात्रेची सांगता झाली. ‎ ‎

त्यामुळे रात्रीतून खंडोबा भक्तांनी ‎परतीचा मार्ग धरला आणि कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या ‎दरबारात दर्शनासाठी हजेरी लावली.‎ शनिवारी दिवसभर हजारो‎ भाविकांना काठ्यांसह‎ तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.‎ दिवसभर भाविकांची मोठी गर्दी‎ होती. शहरातील प्रमुख मार्गावरून‎ खंडोबा भक्तांनी काठ्यांची‎ मिरवणूक काढली होती. या‎ मिरवणुकीने अनेकांचे लक्ष वेधून‎ घेतले होते.शनिवारी पहाटेपासून‎ खंडोबा भक्त तुळजाई नगरीत‎ दाखल झाले होते. दिवसभर‎ तुळजाभवानी मंदिरासह शहरात‎ प्रमुख मार्गावर वाजत गाजत‎ खंडोबा भक्तांनी वारू नाचवला.‎ यावेळी तुळजाभवानी मंदिरात‎ खंडोबाच्या नावानं चांगभलं गजर‎ घुमत होता.

‎सर्वच यात्रा‎ उत्सवानंतर भक्त‎ तुळजाभवानीच्या‎ दरबारात‎
पंढरपूरच्या आषाढी-कार्तिकी यात्रा,‎ गाणगापुरचा दत्त जयंती उत्सव,‎ शिखर शिंगणापूरची महादेवाची‎ यात्रा आदी सर्वच देवी देवतांच्या‎ यात्रा उत्सव नंतर परतीच्या मार्गात‎ कुलदेवता तुळजाभवानी मातेचे‎ दर्शन घेण्याची प्रथा आहे. म्हणूनच‎ सर्वच यात्रा उत्सवानंतर भक्त‎ तुळजाभवानीच्या दरबारात‎ दर्शनासाठी हजेरी लावतात.‎

बातम्या आणखी आहेत...