आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उमरगा तालुक्यातील एकुरगा, बलसूर येथून झाले प्रस्थान; मानाच्या काठ्या शिखर शिंगणापूरकडे रवाना

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्रवारीनिमित्त तालुक्यातील एकुरगा व बलसूर येथून मानाच्या काठ्यांचे सोमवारी (दि.४) शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले. कोरोना संसर्ग काळात सलग दोन वर्षे शासनाच्या सूचनांचे पालन करत एकुरगा येथील जवळगे माळ्यातील जागेवरच या मानाच्या काठीची विधिवत पूजा-अर्चा करण्यात येत असे. गावातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत होता. यावर्षी कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे शिखर शिंगणापूर (ता. माण) येथील श्री शंभू महादेवाची यात्रा चैत्रवारी २०२२ उत्साहात साजरी होत आहे. दोन वर्षांनंतर चैत्रवारी उत्सव यंदा साजरा होत असल्याने या मानाच्या काठीसोबत एकुरगा व पंचक्रोशीतील जवळपास सातशेहून अधिक भाविक सोमवारी शिखर शिंगणापूरच्या दिशेने दर्शनासाठी प्रस्थान केले.

बलसूर येथून महादेवाची कावड रवाना
तालुक्यातील बलसूर येथील मानाची महादेवाची कावड सोमवारी शिखर शिंगणापुरला पायी रवाना झाली. परंपरेनुसार मानाची असलेली महादेवाची कावड सोमवारी शिखर शिंगणापुरला पायी रवाना झाली. या कावडीचे भाविकांकडून गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात येते. धानुरी, तुळजापूर, दहीटने, रोपळे, नरसिंगपूर, फोंडशिरस, नातेपुते मार्गे शिखर शिंगणापुरला पोहोचते. कावडीसोबत दीडशे ते दोनशे भाविक पायी निघाल्याचे मुख्य काटकर संभाजी बिराजदार, शाहूराज बिराजदार, संदीप बिराजदार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...