आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करणार:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के हिस्सा देण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये या रेल्वे मार्गासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

तीर्थक्षेत्र तुळजापूर रेल्वे मार्गाने जोडावे ही तुळजाभवानी मातेच्या भाविक-भक्तांची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मार्गाची घोषणा करून राज्य व केंद्र सरकारच्या ५०-५० टक्के निधीतून या प्रकल्पास मान्यता दिली होती. २०१९ मध्ये कामाचे भूमिपूजनही झाले होते. फडणवीस यांची भेट घेऊन या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारचा निधी देण्याची विनंती केली. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेऊन पुरवणी मागण्यांत रेल्वे मार्गासाठी निधीची तरतूद करण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, मजूर फेडरेशनचे चेअरमन नारायण नन्नवरे, संजय लोखंडे, प्रदीप शिंदे, माजी नगराध्यक्ष सुनिल काकडे, दत्ता देशमुख, अभय इंगळे, देवा नायकल,पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...