आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावाशी नाळ:उपजिल्हाधिकाऱ्यांकडून शाळेला आसन पट्ट्या भेट ; सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेला पुण्याचे उपजिल्हाधिकारी तथा गावचे सुपूत्र संतोषकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी आसन पट्ट्या भेट दिल्या. त्यांनी दिलेल्या आसन पट्ट्यांबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.मांडवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुपूत्र देशमुख यांनी सामाजिक दायित्व म्हणून छोट्या मुलांना बसण्यासाठी २४ आसन पट्ट्या भेट दिल्या.संतोषकुमार देशमुख हे गावचे भूषण असून,त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांना सामाजिक जाणीव असून, त्यातून ते सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात देत आहेत, असे गावचे सुपूत्र तथा सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक आर.बी.गिरी यांनी म्हटले आहे. समाजाचे व गावकऱ्यांचे आपण काही देणे लागतो, ही भावना महत्वाची असून, गावाशी नाळ ठेवत अशी मदत प्रत्येकाने करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...