आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुविधा:निधी मंजूर करूनही गिरवली फाटा ते ईट रस्त्याची रडकथा आहे कायम; दहा वर्षांपासून रस्त्याचे काम चालू, पण पूर्ण होणार केंव्हा?

ईट25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्टीय महामार्ग ५२ गिरवली फाटा ते ईट या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्ड्यांचे सामाज्य पसरले आहे. यामुळे वाहन धारकाना वाहन चालवताना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. या स्त्यावर पडलेले खड्डे चुकवत असताना रोज अपघात होत आहे. यामध्ये मागील आठवड्यात गिरवली येथील महिलेचा मृत्यृही झाला आहे. या अपघातात रोज वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. अन्यथा ७ मे रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय महामर्ग ५२ गिरवली फाटा ते ईट या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.या रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे.तसेच दरवर्षी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाते. मात्र संबंधितांकडून हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे केले जाते.तसेच विभागाच्या अधिकाऱ्यांचे या कामावेळी दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे काम हे निकृष्ट व हलक्या दर्जाचे केले जाते. त्यामुळे या रस्त्यावर दरवर्षी खड्ड्यांचे समाज्य होत आहे. निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये खर्च केलेला पैसा वाया जात आहे. या पडलेल्या खड्ड्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.मागील आठ दिवसांपूर्वी गिरवली येथील एका महिलेचा टू व्हिलरवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

निधी मंजूर होऊनही संबधित विभाग व अधिकारी रस्त्याचे काम करण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तरी या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा दि. ७ मे रोजी राष्ट्रीय महामार्ग गिरवली फाटा या रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. ईटचे सरपंच संजय असलकर, सुनील देशमुख व इतरांनी हे निवेदन दिले.

१५ कोटींचा निधी मंजूर
उपमुख्यमंत्री अजित पवार हे गिरवली याठिकाणी आले असता त्यांनाही या खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागला. त्यामुळे त्यांनी या रस्त्याची अवस्था पाहून या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रुपये निधीही मंजूर करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...