आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात अवैध धंदे बोकाळल्याने युवा वर्ग व्यसनाधीन झाला आहे. भूम पोलिस ठाण्या अंतर्गत गावासह ईट परिसरात दारू,गुटखा,मटका,जुगार,व विना परवाने हॉटल असे अवैध व्यवसाय चालू आहेत. याच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रा.ज्ञानेश्वर गिते यांच्यासह महिलांनी दि.९ मे पासून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करून अवैध धंद्यांना अभय दिला जात असल्याचे आरोप होत आहेत. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी उपोषण कर्ते प्रा. गिते यांची भेट घेतली. मात्र उपोषण मागे घेण्यास नकार दिला. मागील ५ वर्षात वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याची उपोषणकर्त्यांची तक्रार आहे.
अवैध धंद्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा पुढाकार
तालुक्यातील अवैध धंद्याच्या विरोधात सुरु असलेल्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी उपोषण स्थळी जाऊन पाठींबा दर्शविला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष हनुमंत पाटूळे, जिल्हा बँकेचे संचालक आण्णा पाटील, प्रताप देशमुख,भाऊसाहेब चोरमोले, काकासाहेब चव्हाण, नानासाहेब वनवे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.