आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांचे विज्ञान आणि पर्यावरणाशी असलेले नाते दृढ व्हावे, यासाठी मुलांना विज्ञान प्रदर्शनाची आवश्यकता आहे. मानवी जीवनात विज्ञान महत्वाचे असून लहान वयातच विज्ञानाची जाण झाली तरच भविष्यात थोर वैज्ञानिक तयार होऊ शकतात, असे मत विज्ञान विभागप्रमुख परमेश्वर भुजबळ यांनी व्यक्त केले. उमरगा शहरात आदर्श विद्यालयात डॉ. सी. व्ही. रमण जयंतीनिमित्त अपूर्व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य सोमशंकर महाजन यांचे हस्ते झाले. त्यावेळी कांबळे बोलत होते.
यावेळी आदर्श प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवराज औसेकर आदी उपस्थित होते. शालेय विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विज्ञान प्रयोग व प्रकल्पाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. पर्यावरण आणि जागतिक तापमान वाढ, प्रकल्प, पाण्याची बचत, विकसित शहरे, वृक्षारोपण, टाकाऊ पासून टिकाऊ, विजेची बचत अशा विविध विषयांवर आधारित प्रयोग, प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. प्राचार्य महाजन म्हणाले की, विज्ञानाच्या उपासनेशिवाय आजच्या जगात कोणताही देश पुढे जाणार नाही, विज्ञान म्हणजे कृतिशीलतेचे सर्वोच्च स्वरूप आहे.
‘जाणता विज्ञान प्रत्येकाचे, सरती सारी यज्ञ प्रश्न’, असे सांगत विज्ञान आपल्याला सत्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. विज्ञान हे मानवासाठी फार सुंदर देणगी असून याला आपण विकृत स्वरूप देता कामा नये. मानवी जीवन हे विज्ञानाच्या प्रयोगासारखे असून जितक्या वेळा प्रयोग करू तितक्या वेळा चांगले परिणाम मिळतात. विज्ञानाचे चमत्कारामुळेच मानवी जीवन सुखी झाल्याचे सांगितले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले. याप्रसंगी विज्ञान शिक्षक परमेश्वर भुजबळ, पांडुरंग आवटे, विकास कांबळे, कल्पक हुळमजगे, सुवर्णा भालेराव यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक तात्याराव फडताळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.