आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदोत्सव साजरा:विकास महामंडळाचा निर्णय,‎ वडार समाजाकडून स्वागत‎

धाराशिव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडार समाजाची आर्थिक उन्नती व‎ सर्वांगीण विकासासाठी पै. मारुती‎ चव्हाण-वडार आर्थिक विकास‎ महामंडळाची निर्मिती करुन ५०‎ कोटी रुपयांच्या भरघोस निधीची‎ घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात‎ करण्यात आली. यामुळे धाराशिव‎ येथील छत्रपती शिवाजी महाराज‎ चौकात वडार समाजाने फटाक्यांची‎ आतषबाजी करत पेढे वाटून‎ आनंदोत्सव साजरा केला.‎

वडार समाजाचे अनेक‎ वर्षांपासूनचे स्वप्न प्रत्यक्षात‎ साकारल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ व मागणीसाठी पाठपुरावा करणारे‎ औसाचे आमदार अभिमन्यू पवार,‎ तुळजापूर-धाराशिवचे आमदार‎ राणाजगजितसिंह पाटील,‎ सुजितसिंह ठाकूर यांचे अखिल‎ महाराष्ट्र वडार समाज संघटना व‎ वडार समाज बंधू-भगिनींंच्या वतीने‎ आभार व्यक्त करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...