आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद खंडपीठात याचिका:संभाजी नगर, गालिब नगरात अखेर विकासकामे सुरू ; नागरिकांची प्रचंड गैरसोय

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील नारायण कॉलनी, संभाजी नगर, शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुरा भागांतील विकासकामांना अखेर सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यास या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. येथील नागरिकांची पावसाळ्यात होणारी हेळसांड लक्षात घेऊन नगरपरिषद, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या भागातील विकासकामे सुरु करण्यासाठी शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याकडेही मागणी केली होती.

त्यामुळे शहरातील भूमिगत गटारी व रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुरा व शहरात आतापर्यंत जवळपास ३० किलोमीटरचे काम झाले आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर आणि मशिदीच्या परिसरात रात्री गैरसोय होत असल्याने दोन्ही ठिकाणी ४० फूट उंचीचे हायमास्ट लॅम्प उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर अन्य दोन ठिकाणी हायमास्ट लॅम्प उभारणीचे काम सुरू आहे. भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत सहा फुटी रस्त्यांचे काम नव्याने करण्यात यावे. तसेच मोठया रस्त्याचे पॅचवर्क करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे साळुंके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...