आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील मलकापूर येथील श्री गुरुदत्त संस्थानचे अध्यक्ष एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांनी बलात्काराचा प्रयत्न तसेच विनयभंग केल्याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. महाराजांनी परळीतील एका भाविक महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. घटनेनंतर महाराज फरार झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, परळी येथील एक भाविक महिला गुरुवारी (२८ जुलै) दुपारी बसने एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्या मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली. त्यावेळी तेथे भक्तांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ती मठाच्या इमारतीबाहेर पिंपळाच्या झाडाखाली सावलीला थांबली. दुपारी अडीचच्या सुमारास एका शिष्याने महिलेला रूममध्ये जाण्यास सांगितले. पीडिता आतमध्ये जाताच महाराजांनी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे म्हटले. मागील वेळी तुझ्यावर बलात्कार केला होता, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो मी व्हायरल करेन, असे म्हणत अश्लील कृत्य केले. एकनाथ महाराजांनी महिलेला मारहाण केली. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक जी. पी. पुजरवाड करत आहेत. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता ते फरार असून, त्याचा मोबाइल बंद असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
महाराजांचे शिष्यगण संपूर्ण महाराष्ट्रात मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांना मानणारा भक्त वर्ग मोठा आहे. दर महिन्याला मलकापूर येथील संस्थानात मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. महाराज अंगारा देऊन आजार बरे करत असल्याचा बनाव करत आहे. त्यामुळे २०१४ मध्ये त्यांच्यावर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ते अंधश्रद्धा पसरवित असल्याचा आरोप केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.