आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक कार्यक्रम:सावरगाव नागनाथ यात्रेसाठी भाविकांची गर्दी; गण,पालखी मिरवणूक,भाकणूक, दहीहंडी, महाआरती धार्मिक कार्यक्रम

तामलवाडी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रेनिमित्त मंगळवार (दि.२) रोजी नागपंचमी दिवशी नागोबा महाराजांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

परस्परांचे शत्रू मानले जाणारे साप, पाल, विंचू हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असून आषाढी अमावस्या पासून नागपंचमी पर्यंत हे उभयचर प्राणी एकत्र येतात. हा त्रिवेणी संगम पाहण्यासाठी येथे सकाळ पासून गर्दी केली होती. नागपंचमी दिवशी पहाटे नागनाथ मूर्तीस महाअभिषेक घालण्यात आला. दुपारी गावातील प्रमुख मार्गावरून गण, पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डोके कुटुंबीयांनी बनविलेल्या लिंबाऱ्याच्या पाल्याच्या गोलाकार माळा भक्तांनी परिधान केल्या होत्या. गण,पालखीसमोर पारंपारिक गोफ, टिपऱ्या, लाटीकाटी, म्हसवड येथील सुप्रसिद्ध हलगी वादनाचे सादरीकरण झाले. गण पालखी मिरवणूक मंदिर परिसरात आल्यानंतर वर्ष भाकणूक, पारंपारिक नागनाथ साकी, दहीहंडी, महाआरतीने यात्रेची सांगता करण्यात आली. तीन वर्षातून प्रथमच कोरोना निर्बंधमुक्त यात्रा साजरी करण्यात आली. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

या दरम्यान विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी राजकुमार पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे ,रमेश काडगावकर, अरविंद भडंगे, चंद्रकांत गाभणे, प्रमोद माने, नेताजी कदम, सिद्धेश्वर तोडकरी, बंडू तानवडे, भारत कानवले, भारत डोके, पिंटू तानवडे, यांच्यासह इतर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...