आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी गर्दी:मैलारपूर येथे खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नळदुर्ग (मैलारपूर) येथील श्री खंडोबा देवाचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या रविवारी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मैलारपूर येथील मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली होती.नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबा देवाचे मूळ ठिकाण आहे. ऐतिहासिक नळदुर्ग शहरातच श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह झाला आहे.

त्यामुळे भक्तांसाठी मैलारपूर हे श्रद्धेचे ठिकाण आहे. पावणेदोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देवाचे २५ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात आगमन झाले आहे. आता या ठिकाणी दर रविवारी भक्त मोठी गर्दी करतात. ४ डिसेंबर रोजी रविवारी दुसऱ्या खेट्याला मैलारपुरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ६ जानेवारी २०२३ रोजी मैलारपुरात यात्रा भरणार आहे. यात्रेदिवशी याठिकाणी लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासन तसेच देवस्थान कमिटी आतापासुनच तयारीस लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...