आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धनेश्वरी शिक्षण समूहाचे शिक्षक पुरस्कार जाहीर ; संगणक क्षेत्रात कार्य करणा-यांना लवकरच पुरस्कार

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद (प्रतिनिधी)शिक्षक दिनाचे औचित्य साधून धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील धनेश्वरी शिक्षण समूहाने शिक्षकरत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले होते. १६८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण, क्रीडा,संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या २० शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्कार जाहीर केले आहेत.

या पुरस्काराचे वितरण २१ सप्टेंबर पूर्वी होणार असल्याचे देखील सांगितले आहे.धनेश्वरी शिक्षण समूहाने घोषित केलेले धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढील प्रमाणे वरिष्ठ स्तरातून प्रा.डॉ.दादाराव गुंडरे( शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब) प्राचार्य जगदीश गवळी (साई संगणक शास्त्र महाविद्यालय रांजणी),कनिष्ठ माध्यमिक स्तरातून डॉ.मीनाक्षी शिंदे (सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब), माध्यमिक स्तरातून भास्कर खडबडे (जिल्हा परिषद प्रशाला पळसप),सोपान पवार (विद्याभवन हायस्कूल,कळंब) सचिन छबिले (छत्रपती विद्यालय वाशी),रत्नाकर पाटील (विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा शिंगोली),महेंद्र बागडे(जिल्हा परिषद प्रशाला जवळा (नि).ता. परंडा),अलीम शेख (बाणगंगा हायस्कूल,भूम)प्राथमिक स्तरातून संजीवन तांबे(जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,आष्टा),सुखदेव भालेकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी ता. तुळजापूर) गोविंद घारगे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रवाडी ता.लोहारा), हनमंत पडवळ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव(ज)ता.जि.उस्मानाबाद) अशोक ठोंबळ(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई ता.कळंब),राजेंद्र बिक्कड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी ता. कळंब),संगीता भांडवले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कवडेवाडी ता.वाशी),शबाना शेख(जिल्हा परिषद (उर्दू) प्राथमिक शाळा,येडशी)विशेष शिक्षक म्हणून प्रणिता मिटकर(एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा,यमगरवाडी ता. तुळजापूर) याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय,येरमाळा या शाळेंचा विशेष गौरव होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...