आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:धाराशिव, कळंबमध्ये बाळासाहेबांची‎ शिवसेना स्वबळावर मैदानात‎

धाराशिव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धाराशिव आणि कळंब‎ कृषी उत्पन्न बाजार समिती‎ संचालक मंडळाच्या निवडणुकीत‎ बाळासाहेबांची शिवसेना‎ स्वबळावर मैदानात उतरली असून‎ दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पॅनल‎ उभारून लढणार असल्याचे‎ जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी‎ सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक‎ आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा‎ जिल्ह्याचे पालकमंत्री‎ प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या‎ मार्गदर्शनाखाली या निवडणुकीत‎ बाजार समितीची सत्ता खेचून‎ आणणार असल्याचेही ते‎ म्हणाले.दोन्ही बाजार समिती‎ निवडणुकीत सर्व १८ जागांसाठी‎ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र‎ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे‎ सोमवारी दाखल करण्यात आले.‎ धाराशिव येथे उमेदवारी अर्ज‎ दाखल करताना जिल्हाप्रमुख सुरज‎ साळुंके उपस्थित होते.‎