आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परिपत्रकानुसार बस आगारात सामुदायिक अभिवादन झाले नाही. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आगार व्यवस्थापकांविरुद्ध कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
यासंबंधी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनी उमरगा आगारात आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी अभिवादन कार्यक्रम घेतला नाही. कामगार संघटनेने महापरिनिर्वाण दिन घेण्यास सांगितल्यावर आगार प्रमुखांनी आक्षेपार्ह विधाने करुन नकार दिला.
या अवमानकारक कृतीची दखल घेवून आगार प्रमुखांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष यशवंत भंडारे, उपाध्यक्ष सोमनाथ येवते, सचिव वैभव कांबळे अभिजित भालेराव, सुनिल साळुंखे, विकास गायकवाड, लोहारा तालुकाध्यक्ष अमित सुरवसे, रवींद्र कांबळे, खंडू कांबळे, योगेश सुरवसे, राजेश मोरे, महेश दळवी, सौरभ इंडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.