आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषद:स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी शुक्रवारी संवाद परिषद

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​मराठवाड्याचा अविकसितपणाचा कलंक, द्रारिद्रय संपवण्यासाठी मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याच्या मागणीसाठी येथे शुक्रवारी (दि. २५) दुपारी ४ वाजता संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. परिषदेसाठी ॲड. सदावर्ते, मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे . के. जाधव, संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे, डॉ. परमेश्वर गुट्टे, प्रदेश संघटक डॉ. भागवत नाईकवाडे, युवती प्रदेशाध्यक्ष अमृता चव्हाण आदी उपस्थित राहतील.उपस्थित राहण्याचे मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रेवण भोसले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...