आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन;  जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तामलवाडी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी असलेले जवान दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे यांचे (५१) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) पुणे येथे कर्तव्यावर असताना रविवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१३) माळुंबा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सन्मानार्थ तामलवाडी पोलिस दलाने बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. उपस्थित जनसमुदायाने ‘अमर रहे...अमर रहे... दत्तात्रय वाघमारे अमर रहे

बातम्या आणखी आहेत...