आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय गुरुदेव:दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा सर्वत्र जयघोष ; आरसोली येथे दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मार्गशीर्ष शु.चतुर्दशी म्हणजे दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्माचा पाळणा सोहळा विविध मंदिरामध्ये भक्तिभावाने संपन्न झाला. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी गावातील स्वामी समर्थ नगर येथे दि(७)बुधवार रोजी स्वामी समर्थ मंदिरा दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी १० ते १२ भजन व १२ वाजता दत्त जन्म साजरा करण्यात आला, भजन कार्यक्रम, व अन्नदान कार्यक्रम वैभव मिसाळ यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला यावेळी,सगुणा देवकर, अलका घोळवे, छाया रणखान, छाया जगताप, कुसुम देशमुख, लता कांबळे, निर्मला जावळे,पंचफुला सावंत, केशर मुंढे, चंद्रकला डुमने,केशर मिसाळ, शीतल मिसाळ,गंगा घोळवे, सिंधू घोळवे, लता घावटे, इंदू जगदे, शालू बेदरे, भाभी घायतिडक,स्वाती घावटे, अनिता देवकर कविता कोळी, दीपा कटाळे,उषा झोबाडे,जोती शिनगारे, छाया भोसले, तसेच भजनी मंडळीआदी उपस्थित होते .

कळंबमध्ये दत्त जयंती कळंब येथे दशनाम गोसावी समाजाच्या वतीने दत्त जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही कळंब शहरात बाबानगर येथे महादेव मंदिर गोसावी समाजाच्या वतीने दत्तजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापूजा गजानन पुरी यांच्या हस्ते करण्यात आली. ह. भ. प झाकडे यांचे किर्तन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळांचे अध्यक्ष बिभीषण गिरी, महेश पुरी, राजेश पुरी, दत्ता बन, शरद बन, प्रशांत पुरी, धनंजय भारती, लहू गिरी, अरूण गिरी, दिनेश गिरी, विजय पुरी, सचिन पुरी उपस्थित होते.

पारगाव वाशी तालुक्यातील पारगाव येथे बुधवारी (दि.७) मंदिर परिसरात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त हातोला, जाणकापुर, मानेवडी व पारगाव येथील ज्योतिर्लिंग भजनी मंडळानी संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला. हनुमंत महाराज आहेर यांच्या दत्त जन्माच्या कीर्तनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ज्योतिर्लिंग भजनी मंडळाच्या वतीने महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भूम भूम तालुक्यासह शहरात मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील आरसोली येथे वैद्यराज दिगंबर बाराते यांच्या आरसोली येथील शेतात श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित श्री दत्त मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

येथील दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बापूसाहेब बाराते, भाऊसाहेब कुलकर्णी, वसंतराव पाटील, जे. डी. सुळ, आशिष बाबर उपस्थित होते.

मंदिरांना रोषणाई दत्तजयंती निमित्ताने शहर आणि जिल्ह्यात अनंक मंदिरांमध्ये जन्मोत्सवाचा पाळणा बुधवारी हलला. गुलाल उधळून , सुंठवडा वाटून दत्तजन्माेत्सव साजरा करण्यात आला. जयंतीच्या निमित्ताने विविध भजनी मंडळे व प्रवचनकारांनी आपनी सेवा सादर केली. जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध मंदिरांना रोषणाई करण्यात आली होती. तसेच गाभारे फुलांनी सुशोभित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...