आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालयची दुरावस्था:भिमनगर, सिध्दार्थ‌‌‌ नगर, आराधवाडीत घाणीचे साम्राज्य

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भिमनगर, सिध्दार्थ‌‌‌ नगर, आराधवाडी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागातील शौचालयची दुरावस्था झाली आहे. या भागात तातडीने स्वच्छता करण्यासह शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) च्या वतीने पालिकेचा मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.

पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील भिमनगर, सिध्दार्थ‌‌‌ नगर, आराधवाडी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर कचऱ्याचा खच पडला आहे. घरामध्ये, रस्त्यावर गटारीचे पाणी येत आहे. तर या घाणीवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठ दिवसात या भागात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर तानाजी कदम, आरूण कदम, अमोल कदम, दिपक कदम, अनिकेत सोनवणे, राहुल सोनवणे, प्रेम कदम, ओम भालेकर, आत्माराम सोनवणे, अंकुश माने, नितीन चिमणे, दिपक गौतम कदम, अमर कदम, संदीप साखरे आदी ४० ते ५० नागरिकांचा स्वाक्षऱ्या आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्र असल्याने शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. हे प्रकल्पही शहराच्या महत्वात भर टाकणारे ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या नागरी समस्या डोके वर काढत असतील तर ते गालबोट लागल्यासारखे होईल.

बातम्या आणखी आहेत...