आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्याक्षिके:श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिके

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालय आयोजित उस्मानाबाद जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभाग व एन.डी.आर.एफ.पुणे पथक यांच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने हाताळायला हवी यासाठी शाळा महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती होण्यासाठी भोसले हायस्कूल जुन्या इमारतीत झाले. सुरुवातीस जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी प्रास्तविक केले. त्यांनी एन.डी.आर .एफ. पथक प्रमुख सुशांत राढा यांच्या बाकी पथकातील सहकार्याने आपत्ती व्यवस्थापनाचे माहिती सह प्रशिक्षण व प्रात्यक्षिके सादर केली. प्रशालासह महविद्यालयातील ८०० विद्यार्थ्यां सह शिक्षक- शिक्षिकांना मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य तथा मुख्याध्यापक साहेबराव देशमुख, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, नंदकुमार नन्नवरे, शेषनाथ वाघ यासह ३० शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...