आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १) त्यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलेल्या मागणीनुसार बैठक झाली. आमदार चौगुले यांनी महाराष्ट्र विद्यापीठ, महाविद्यालयीन सेवकांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत सेवांतर्गत सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनरुज्जीवित करुन सुधारीत सेवेंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करा, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०, २० व ३० वर्षांनंतरचे लाभार्थी योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगापासून वंचित १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झालेल्या कालावधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे, सन २००५ च्या नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरुन त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी योजना पूर्ववत लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री यांच्यासोबत चर्चा केली. मंत्र्यांना हा प्रश्न सोडवणार, असे सांगितले. १४१० कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची कार्यवाही १५ दिवसात करण्यात येईल. ५८ महिन्यांच्या थकबाकीबाबत वित्त मंत्र्यांसोबत बोलून विषय तातडीने सोडवणार, असे सांगितले.
या बैठकीत उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, सचिव उच्च व तंत्र, वित्त विभागाचे अधिकारी, कृती समितीचे मुख्य संघटक अजय देशमुख, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, अध्यक्ष प्रकाश म्हसे, मिलिंद भोसले, प्रमुख सल्लागार आर. बी. सिंह, गोपाल सोनवणे व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.