आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली:डीसीसी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. ३०) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीत कर्जवसुली करून सहकार्य केलेल्या संचालक मंडळाचा सत्कार करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बँकेच्या कार्यक्षेत्रात ४६७ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यरत असून पैकी ५२ सहकारी संस्थांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत १०० टक्के कर्जवसुली करून सहकार्य केल्याबद्दल संबंधित संस्थेचे चेअरमन व सचिवांचा सत्कार करण्यात आला.

तसेच एप्रिल ते जून २०२२ दरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २७ वसुली पथके स्थापन केले असून पथकामार्फत बैठा सत्याग्रह अभियान राबवून २० कोटी शेती कर्ज व ४ कोटी बिगरशेती कर्जाची वसुली केली. यापैकी टॉपच्या १० वसुली टिम लिडरचा सत्कार करण्यात आला. बैठकीत बँकेच्या उपविधी दुरुस्तीसह शेती, बिगरशेती फर्मच्या ओटीएस योजनांस मान्यता देण्यात आली. बँकेने वैयक्तीक सभासद, शेतकरी, पगारदार, ग्राहकांना थेट सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा सभासदासाठी संचालक मंडळावर प्रतिनिधीत्व देण्याचा विषयही मान्य करण्यात आला आहे.

बैठकीला उपाध्यक्ष मधुकर मोटे, संचालक सुनील चव्हाण, बळवंत तांबारे, ज्ञानेश्वर पाटील, नागप्पा पाटील, विक्रम सावंत, सुरेश बिराजदार, संजय देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...