आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत शिक्षण योजना:जिल्हा मेस्टा कार्यकारिणीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा मेस्टा कार्यकारिणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थित शहरातील अभिनव इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाली. या वेळी संस्थाचालक व शाळेच्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी आरटीई मोफत शिक्षण योजने अंतर्गत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची फीस शासनाकडून २०१९-२०, २०२० -२१, २०२१-२२ या तीन वर्षाची रक्कम येणे आहे. ही रक्कम शासनाने शाळेच्या बँक खात्यावर त्वरीत वर्ग करावी, अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठराव पारित करण्यात आला.

तसेच आरटीई प्रमाणपत्राचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल केलेल्या शाळांना त्वरित प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावेत, असाही ठराव मंजूर करण्यात आला. विद्यार्थी टीसी नियमानुसार फीस भरून घेवूनच देण्यात यावी. शिक्षणाधिकाऱ्यांकडे टीसी देत नसल्याबद्दल पालक तक्रार करतात व शिक्षण विभाग शहानिशा न करताच टीसी देण्याबाबत शाळेला पत्र देतात. याबाबत शिक्षण विभागाने पालकांना फीस भरुन शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जावा, अशी समज द्यावी. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस २८ ऑगस्ट २०२२ रोजी बीड येथे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले.

या वेळी संजय तायडे पाटील यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांनी केले, या बैठकीस कार्याध्यक्ष सय्यद एस. ए. सतीश, सरचिटणीस शहाजी जाधव, कोषाध्यक्ष भास्कर बोंदर, सचिव सचिन पाटील, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, डाॅ. रामेश्वर यादव, दत्तात्रय दिवाने आदी संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहाजी जाधव यांनी केले तर आभार सय्यद यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...