आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुळजापूर:मंदिरात बेशिस्त वर्तन; 8 पुजाऱ्यांना 3 महिन्यांसाठी बंदी, 16 जणांवर टांगती तलवार

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुळजाभवानी मंदिरातील 24 पुजाऱ्यांवर कारवाई

तुळजाभवानी मंदिरात नियम माेडणाऱ्या २४ बेशिस्त पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने देऊळ कवायत कलमानुसार कारवाई केली. यात ८ पुजाऱ्यांना ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी, शिफ्ट नसताना गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या १६ पुजाऱ्यांवर ६ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये, अशा विचारणेच्या नोटिसा बजावल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरात गर्दी करू नये, डिस्टन्सिंगचे पालन करावे आदी सूचना मंदिर संस्थानने पुजाऱ्यांना दिल्या होत्या. या कालावधीत पुजाऱ्यांना मंदिरात पूजाविधी करण्यासही निर्बंध होते. मात्र या नियमांचे उल्लंघन व बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवत मंदिर संस्थानने ८ पुजाऱ्यांवर देऊळ कवायत कलम २४, २५ नुसार ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...