आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात खरीप २०२२ चा पिकविमा वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यांना मिळण्यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेकांना भरलेल्या हप्त्यापेक्षाही कमी रक्कम मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासाठी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
खरीप हंगामातील विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यात १२७ म्हणजे एकूण २५४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, शेतकऱ्यांना अत्यंत असमतोल प्रमाणात विमा रक्कम वितरीत केली जात आहे. काहींना हेक्टरी सहा ते १५ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर काहींना भरलेल्या हप्त्यांऐवढीही रक्कम देण्यात आलेली नाही.
शिवसेना याचिकेत हजर होणार सध्या २०२० चा विम्यासंदर्भात बजाज कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये शिवसेनेने ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली, त्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढील तारखेत हजर होऊन पार्टी म्हणून सुनावनीत सामिल करून घेण्याचा अर्ज देणार आहे, असेही आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
शिवसेना स्टाईलने उत्तर खासदार राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या सरकारच्या विरोधात पुन्हा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाला नेमक्या कोणत्या निकषाच्या आधारे पिकविमा वितरीत करण्यात आला हे माहिती नाही. सरकारी कंपनीने मनमानीपणे विमा दिला आहे. ही कंपनी बजाज कंपनीपेक्षाही खराब आहे.
दुधगावकर करणार आंदोलन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत विमा रक्कम अत्यल्प मिळालेले आहे. ती नुकसानीप्रमाणे मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.