आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशी तालुक्यातील पारगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोली बांधकाम निधीसाठी ( लोकवाटा) ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतला असून मंगळवारी ( ता.६) पहिल्याच दिवशी १ लाख २१ हजार ६११ रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ गुणवत्ता विकास कार्यक्रमा अंतर्गत नवीन चार वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी ३६ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचा दहा टक्के वाटा लोकसहभागातून जमा करण्याबाबत मंगळवारी ( ता.६) येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वाशीच्या नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या निजामकालीन चार वर्ग खोल्या निर्लेखीत करून नवीन बांधकामासाठी शासस्तरावरून निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना लोकसहभागातून राबवण्यात येणार असुन यासाठी दहा टक्के ३ लाख ६८ हजार रुपये लोकवाटा जमवण्याचे उदिष्ट ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आले आहे.प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, पालक व शिक्षकांनी ग्रामसभा सुरू असतानाच १ लाख २१ हजार ६११ रुपयांचा निधी मुख्याध्यापक दत्तात्रय मोहिते यांच्या कडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्याम कवडे यांनी केले. यावेळी गटशिक्षण अधिकारी भारत बन,ग्रामविकास अधिकारी प्रविण देशमुख, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, महादेव आखाडे, माजी उपसरपंच डॉ. अनंत कुलकर्णी, सारंग मोटे, धनंजय मोटे, समाधान मोटे, चेतन तातुडे, ॲड. प्रकाश मोटे, महादेव मोटे, विकास तळेकर उपस्थित होते.
टेंडर पद्धतीला विरोध, मात्र शासन निर्णय अंतिम वर्ग खोल्यांच्या बांधकामांसाठी टेंडर प्रक्रिया जिकरीची ठरणार असून बांधकामाचा दर्जा राखण्याबाबत ग्रामस्थ व संबंधित गुत्तेदार यांच्यात संघर्ष होऊ शकतो.यासाठी ही कामे ग्रामपंचायत किंवा शालेय शिक्षण समिती मार्फत कारण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. परंतु हा शासन निर्णय असल्यामुळें या पद्धतीत बदल करता येत नसल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.