आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जि. प. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढू; शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांची बैठकीत माहिती

कळंब5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढले जातील अशी ग्वाही प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.अरविंद मोहरे यांनी दिली असल्याची माहीती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.

दिनांक १ आँगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासमवेत उस्मानाबाद जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डाँ .अरविंद मोहरे यांनी दोन तास बैठक घेऊन शिक्षकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नावर चर्चा करुन प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी कार्यवाही सुरु केली. त्यात प्रामुख्याने जिल्हास्तरावर अनेक दिवसापासुन प्रलंबित असलेला वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रश्न त्यात १२७ पैकी १२२ प्रस्ताव लगेच मान्य करुन मंजुरी साठी पाठवली.

शिक्षक संघाच्या शिष्टमंडळात राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष , सोमनाथ टकले, एल.बी पडवळ,जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा संपर्क प्रमुख धनंजय मुळे,ज यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी कळंब तालुका कार्याध्यक्ष प्रशांत घुटे यांनी शिक्षणाधिकारी डॉ.मोहरे , सुरेश वाघमारे व पदाधिका-यांचे आभार मानले.

आर्थिक तरतुदींची मागणी
प्रलंबित पुरवणी देयके व सातव्या वेतन आयोगातील दुसरा व तिसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करणे साठी आर्थिक तरतुदीची प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांचे कडे लगेच मागणी करण्यात आली. विद्यार्थीं गणवेश अनुदान व समग्र शिक्षा अनुदान मागणी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. त्या बाबत लगेच प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना मेल करुन पत्र पाठवण्यात आहे. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश वाघमारे यांनी हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...