आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:जि. प. शााळेच्या विद्यार्थ्यांचे‎ सामान्य ज्ञान परीक्षेत यश‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात जिल्हा परिषद‎ प्रशालेत विजेता आयएएस‎ अकॅडमी मुंबई पुरस्कृत पांडुरंग‎ स्मृतीच्यावतीने स्पर्धा परीक्षा‎ सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते.‎ स्पर्धा परीक्षेच्या वतीने सामान्य‎ ज्ञान स्पर्धा पाचवी ते सातवी व‎ आठवी ते दहावी या दोन गटात‎ घेण्यात आली. स्पर्धेमध्ये‎ प्रशालेतील पाचवी ते सातवीच्या‎ गटामधून नागेश करनुरे व अभिषेक‎ बरकंबे. आठवी ते दहावी गटातून‎ ममता वरवटे सृष्टी बिराजदार व‎ क्रांती गायकवाड विद्यार्थिनींनी‎ परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले‎ आहे. विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, रोख‎ रक्कम व प्रमाणपत्र देवून आमदार‎ ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते‎ गौरविण्यात आले.

यशस्वी‎ विद्यार्थ्यांना शिक्षक सरिता उपासे,‎ सोनाली मुसळे, शिल्पा‎ चंदनशिवे,ममता गायकवाड‎ बलभीम चव्हाण, संजय‎ रुपाजी,सदानंद कुंभार,बशिर शेख‎ विद्यानंद सुत्रावे यांनी मार्गदर्शन‎ केले. शालेय व्यवस्थापन समिती‎ अध्यक्षा शकुंतला मोरे, सदानंद‎ शिवदे-पाटील अमर वरवटे,‎ मुख्याध्यापक पद्माकर मोरे,‎ गटशिक्षण अधिकारी शिवकुमार‎ बिराजदार, काकासाहेब साळुंके,‎ केंद्रप्रमुख शिला मुदगडे यांनी‎ विद्यार्थ्यांचे कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...