आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा ‎:सुधारित पद्धतीने विमा वाटप करा‎;जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचा विमा कंपनीला कारवाईचा इशारा ‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्‎ह्यातील शेतकऱ्यांना भारांकन‎ लावून वाटप करण्यात आलेला‎ पिक विमा अमान्य असून तातडीने‎ सुधारित पद्धतीने विमा वाटप करावा‎ अन्यथा कारवाई करण्यात येईल,‎ असा इशारा डॉ. सचिन ओम्बासे‎ भारतीय कृषी विमा कंपनीच्या‎ विभागीय व्यवस्थापकांना दिला‎ आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण‎ समितीची बैठक पार पडली. यावेळी‎ जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे‎ तसेच कृषी विभागातील व विमा‎ कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.‎

यावेळी मार्गदर्शक सुचनेतील मुद्दा‎ क्र. २१.५.१० नुसार मधील ५०:५०‎ भारांकन लावून निश्चित केलेली‎ नुकसान भरपाई जिल्हास्तरीय‎ समितीस मान्य नसून सुधारीत‎ नुकसान भरपाई निश्चिती करुन‎ त्यानुसार वाटप करावे. जिल्ह्यात‎ शेतकऱ्यांना यावर्षीचा पिक विमा‎ असमतोल पद्धतीने विक्रीत केला‎ आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी‎ असे आदेश दिले आहेत. दि. ३ व‎ १४ डिसेंबर २०२२ रोजीच्या‎ बैठकांमध्ये झालेल्या आदेशाप्रमाणे‎ कारवाई करणे. तसेच देण्यात‎ आलेले आदेश व इतिवृत्तांचा बाबत‎ केलेल्या कार्यवाहीचा लेखी‎ अहवाल सादर करणे, विमा‎ कंपनीकडील पंचनाम्याची प्रती ७‎ दिवसांच्या आत तालुका कृषि‎ अधिकारी कार्यालयास सादर करून‎ तसा अहवाल जिल्हास्तरीय‎ समितीस सादर करावा.‎

पुर्वसुचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे‎ पंचनामे झालेले नाहीत अशा‎ शेतकऱ्यांना त्या कालावधीतील त्या‎ महसूल मंडळतील नुकसानीची‎ सरासरी काढून त्याप्रमाणे विमा‎ भरपाई तात्काळ वितरीत करावी.‎ जिल्हयातील विमा हप्ता, प्राप्त‎ झालेली रक्कम व त्यानुसार वाटप‎ होणारी रक्कम याबाबतची माहिती‎ दोन दिवसांमध्ये सादर करण्याचे‎ आदेश जिल्हा प्रशासनाने दिले‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...