आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलींचे वाटप‎:गुंजोटी येथील विद्यार्थिनींना 18 सायकलींचे वाटप‎

गुंजोटी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे‎ पंचायत समिती सदस्या क्रांतीताई‎ किशोर व्हटकर यांच्या प्रयत्नातून‎ उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या‎ समाजकल्याण व‎ महिला-बालकल्याण विभागाकडून‎ मुलींसाठी मंजूर झालेल्या १८‎ सायकलींचे शनिवारी (दि.४)‎ येथील श्रीकृष्ण विद्यालयात वाटप‎ करण्यात आले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

यावेळी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे‎ उपाध्यक्ष प्रभाकर हिरवे, संचालक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ डॉ. सागर पतंगे, श्रीकृष्ण विद्यालयाचे‎ मुख्याध्यापक एस. एन. बुदले,‎ प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका‎ सुरेखा भोसले, उपमुख्याध्यापक‎ संजय कदम, पर्यवेक्षक अजय‎ गायकवाड, उमरगा महिला व‎ बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका‎ विद्या कांबळे, समर्पण सामाजिक‎ संस्थेचे किशोर व्हटकर यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवानंद‎ बुदले यांनी केले. सोमशंकर कुंभार‎ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार‎ अजय गायकवाड यांनी मानले‎

या विद्यार्थिनींना लाभ
‎ऋतुजा जाधव, ऋतुजा म्हेत्रे, मानवी‎ कटकधोंड, प्रणाली शिवनेचारी,‎ आर्या दूधभाते, अंजली भिसे,‎ पल्लवी बनसोडे, स्वप्नाली यमगर,‎ गायत्री माने, स्नेहल पांढरे, साधना‎ जमादार, मोहिनी लवटे, ऐश्वर्या‎ जीवनगे, सायली कांबळे, कृष्णा‎ टोंगळे, ऐश्वर्या भालशंकर,‎ साईलक्ष्मी व्हटकर, दीपाली काळे.‎

बातम्या आणखी आहेत...